कोलाड पोलीस ठाण्यातील चार पोलीस योद्धांची कोरोनावर मात

कोविड -१९ या आजाराने जगभर थैमान घातले आहे. या रोगाची झळ सर्वसामान्य जनतेला बसू नये यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र मेहनत घेऊन जनतेला या विषाणूची लागण होऊ म्हणून कर्तव्य पार करीत असतांना कोलाड पोलिस स्टेशनमधील एन.जी पवार, पी.जी.पाटील, ई एस सय्यद, ए बी पाटील, या चार पोलिस योद्धा ना कोरोनाची लागण झाली होती.

रोहा: कोलाड पोलीस स्टेशनमधील चार पोलीस कर्मचा-यांनी कोरोनावर मात करून मंगळवार दि.११ रोजी आपल्या कर्तव्यावर पुन्हा हजर झाले. यावेळी कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे व सर्व कर्मचारी यांनी या चार पोलीस कोरोना योद्धावर पुष्पवृष्टी, आरती करुन जोरदार स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.         

कोविड -१९ या आजाराने जगभर थैमान घातले आहे. या रोगाची झळ सर्वसामान्य जनतेला बसू नये यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र मेहनत घेऊन जनतेला या विषाणूची लागण होऊ म्हणून  कर्तव्य पार करीत असतांना कोलाड पोलीस स्टेशनमधील एन.जी पवार, पी.जी.पाटील, ई एस सय्यद, ए बी पाटील, या चार पोलीस योद्धांना कोरोनाची लागण झाली होती.

हे चारी योद्धा कोरोनावर मात करून आपल्या कर्तव्यावर पुन्हा हजर होताच त्यांचे पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे, ठोबरे, माने, जाधव, पाटील,  विघ्ने, तडवी, तावडे, महाडिक, लंजारे , बाकडे या सर्व सहकाऱ्यांनकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत करण्यात आले आहे.