निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसीन मिळणार – पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल: निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिकाधारक रायगडवासियांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री

पनवेल: निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिकाधारक रायगडवासियांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. 

अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्हयातील अनेक भागात नुकसान झाले. वादळामुळे संपर्क यंत्रणा कोलमडल्या, वृक्ष उन्मळून पडले, वाहतुक विस्कळीत झाली.  वादळाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यांना बसला.  जिल्हयातील महावितरणाच्या विद्युत यंत्रणेचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. वीजपुरवठा तत्काळ पुर्ववत करण्याबाबत महावितरणला त्वरित आदेश देण्यात आले आहेत.  मात्र मुळात अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास थोडा अवधी लागणार आहे.  केरोसीन नसल्यामुळे येथील लोकांना घरामध्ये कंदिल, दिवे लावण्यासाठी अडचणी उद्भवत आहेत. यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसीन राज्यास उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५  शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रतिशिधापत्रिका ५ लिटर केरोसीन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसीन नियतन मंजूर करण्यात आले आहे.