leopard movement freely

यासंदर्भात माझेरी गावातील स्थानिक नागरिकांकडून विचारणा केली असता त्याने गेल्या आठ दिवसांपासून परिसरामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचा संचार होत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले मात्र आतापावेतो परिसरातील दोन कुत्रे फस्त केले आहेत तर तीन कुत्रे व वासरु जखमी झाले आहेत.

महाड : माझेरी परिसरातील गेल्या आठ दहा दिवसा पासून बिबट्याने  (leopards) धुमाकूळ घातल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन खात्यामार्फत (forest department) नागरीकांना सतर्कतेचे आवाहन करीत आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. (warning to citizens)

माझेरी नागरिकांसमोर नव्याने संकटे उभी रहात असून या मार्गावरील घाट माथ्यातील होणाऱ्या अपघातांनी सावरत असतानाच माझेरी गावाच्या परिसरात एक बिबट्या मुक्तपणे संचार (Free movement) करीत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिल्यानंतर याबाबत वन खात्याकडून परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा हा परिसरात प्रसिद्धीपत्रके व फ्लेक्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे .

यासंदर्भात माझेरी गावातील स्थानिक नागरिकांकडून विचारणा केली असता त्याने गेल्या आठ दिवसांपासून परिसरामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचा संचार होत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले मात्र आतापावेतो परिसरातील दोन कुत्रे फस्त केले आहेत तर तीन कुत्रे व वासरु जखमी झाले आहेत.

या संदर्भात वन विभागाशी संपर्क साधला असता वनरक्षक जाधव यांनी वन अधिकारी शिंदे यांच्या मार्ग दर्शना खाली वनपाल शिवगुंडे यांच्या नेतृत्वा खाली पाच जणांचे पथक जंगल भागात गस्त घालून फटाके वाजवून हा बिबट्या नागरी वस्ती पासून लांब जावा यासाठी प्रयत्न करीत आहेत गावा गावातील तरुणांचे समूह तयार करून त्यांच्या गस्ती वाढवून डबे वाजवून फटाके फोडून या श्वापदांना नागरी वस्ती पासून लांब पाठवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

त्याच बरोबर वन विभागाकडून जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत असे सांगितले माझेरी भागात पाळीव जनावरांवर झालेला हल्ला पाहता हा हल्ला बिबट्याच्या पछड्या कडून झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे मादी पासून भरकटलेल्या या बिबट्याला अद्याप शिकारीचा अनुभव नसल्याने माणसांचा गोंगाट ऐकताच आपली शिकार अर्धवट टाकून तो पळून जात आहे माझेरी पारमाची या आदर्श गावात वृक्ष तोड थांबल्याने जंगल वाढल्याने या श्वापदांचा वावर वाढला आहे असे वन विभागाकडून सांगण्यात आले.