श्रीवर्धन शहरातील दादर पुलावरती कचऱ्याचे ढीग, नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

श्रीवर्धन बाजारपेठ येथे असलेले भाजी विक्रेते व अन्य दुकानदार याच ठिकाणी पुलावरती कचरा टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. तसेच या पुलाच्या समोर असलेला एक भाजीविक्रेता आपला टेम्पो या ठिकाणी कायम पार्क करून ठेवतो. त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी देखील होते.

श्रीवर्धन शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये दादर पूल आहे. या पुलाच्या खालून एक भला मोठा नाला वाहत जातो. याठिकाणी पेशवे आळी ते दादर पुल यावरती रस्ता बांधण्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणाला कॉंक्रिटीकरण सुरु असल्यामुळे कचरा टाकणे बंद आहे. परंतु श्रीवर्धन बाजारपेठ येथे असलेले भाजी विक्रेते व अन्य दुकानदार याच ठिकाणी पुलावरती कचरा टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. तसेच या पुलाच्या समोर असलेला एक भाजीविक्रेता आपला टेम्पो या ठिकाणी कायम पार्क करून ठेवतो. त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी देखील होते.

बाजारपेठेतील भाजी विक्रेते व अन्य दुकानदार दादर पुलावरती कचरा टाकत असल्यामुळे एक बाजू पूर्णपणे कचऱ्याने भरलेली असते व सकाळच्या वेळामध्ये याठिकाणी नगरपरिषदेचा ट्रॅक्टर कचरा उचलण्यासाठी उभा असतो. सध्या गौरी-गणपतीच्या सणामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशातच एक ट्रॅक्ट-र व टेम्पो या ठिकाणी उभा असल्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

मात्र श्रीवर्धन नगर परिषदेकडून या ठिकाणी कचरा टाकू नये किंवा या ठिकाणी टाकलेला कचरा उचलण्यासाठी तात्काळ सुविधा उपलब्ध नसल्याने श्रीवर्धन बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना आपले नाक मुठीत घेऊन फिरावे लागते. तरी श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाकडून अशाप्रकारे कचरा टाकणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर किंवा अन्य दुकानदारांवर किंवा त्या ठिकाणी अनधिकृतपणे उभा असलेल्या टेम्पो चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्रीवर्धनमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.