karnala gas tanker accident

पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावरील(mumbai goa highway) कर्नाळा(karnala) खिंडीजवळ सोमवारी सकाळी एक गॅस टँकर उलटल्याने(gas tanker accident) टँकरचा क्लिनर जखमी झाला असून त्याला एमजीएम कामोठे येथे उपचारार्थ दाखल केले आहे. यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.

आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीजवळ पेणकडून पनवेलकडे गॅस टँकर येत असताना एका वळणावर अचानकपणे टँकरचालकाचा ताबा सुटून सदर टँकर बाजूला उलटला. यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती .

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पळस्पे वाहतुक शाखेचे पथक, पनवेल नवीन तालुका पोलीस ठाण्याचे पथक व अग्निशामक दलाचे बंब पोहोचले होते व त्यांनी क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला केला. या घटनेत टँकरचा क्लिनर जखमी झाला असून त्याला एमजीएम कामोठे येथे उपचारार्थ दाखल केले आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सोमवार आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने कार्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी निघालेल्या कर्मचार्‍यांना या अपघातमुळे कामावर जाण्यास उशीर झाला.