manik jagtap

महाड : राज्यातील पर्यटन स्थळे(tourist spots), समुद्र किनारे(beaches) खुले करण्यात आले आहेत. मात्र ऐतिहासिक स्थळावरील प्रवेश बंदी अद्याप कायम आहे. शनिवारी महाड येथील पत्रकार मनोज खांबे यांनी, किल्ले रायगड आणि चवदार तळे येथील प्रवेश बंदी हटविण्याची मागणी करित रायगड पायथ्याला उपोषण आंदोलन सुरू केले होते. त्याच उपोषणाचा आधार घेत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप(manikjagtap) यांनी किल्ले रायगड, चवदार तळ्यासह राज्यातील सर्व ऐतिहासिक आणि पुरातन ठिकाणे सर्व सामान्य माणसासाठी खुली करण्यात यावीत अशी मागणी केली आहे. या मागणीचे एक निवेदन शनिवारी सायंकाळी जगताप यांनी ईमेलद्वारे मुख्यमंत्र्यांना (chief minister) पाठविले.

गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे ऐतिहासिक आणि पुरातन ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्याचा गंभीर आर्थिक परिणाम त्या त्या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय करून आपली उपजिविका करणाऱ्या स्थानिकांना बसला असून, आज त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचे जगताप यांनी या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

किल्ले रायगड आणि चवदार तळ्यासारखे ऐतिहासिक ठिकाणे प्रेरणा आणि स्फुर्ती देणारी आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ही ठिकाणे बंद असल्याने सर्वसामान्य माणसांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे या ठिकाणांवरील प्रवेश बंदी तत्काळ हटविण्यात यावी अशी विनंती  जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.