grandfather fired bullet bymistake hit the grandson in mahad
आजोबांचा नेम चुकला; गोळी लागून नातू जखमी

मात्र त्यांचा नेम चुकला आणि बंदुकीतून झाडलेली गोळी जवळच उभ्या असलेल्या कविराज अनंत साळवी (वय ३१ ) याच्या कमरेला लागली. यात तो गंभीर जखमी झाला आहे.

महाड : कुत्र्याला मारलेली गोळी नेम चुकल्याने नातवाला लागल्याने नातू गंभीर जखमी झाला आहे . महाड तालुक्यातील कोकरे येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. सेवानिवृत्त सैनिक असलेले यशवंत साळवी (वय ७५,रा. कोकरे ) हे आपल्या जवळील एका नळी बंदुकीने गावातील पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांचा नेम चुकला आणि बंदुकीतून झाडलेली गोळी जवळच उभ्या असलेल्या कविराज अनंत साळवी (वय ३१ ) याच्या कमरेला लागली. यात तो गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी गावचे पोलीस पाटील भीमराव धोत्रे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी यशवंत साळवी याच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३३७, ३३८, शस्त्र अधिनियम २५ (१), (अ ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.