corona

सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (दि.११) एकाच दिवशी ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल ७५ रुग्ण झाले आहेत. जनतेने अधिक सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.

 पाली : सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी  (दि.११) एकाच दिवशी ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल ७५ रुग्ण झाले आहेत. जनतेने अधिक सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.         

सुधागड तालुक्यात कोरोनाचे आत्तापर्यंत ४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि ३३ जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली आहे. प्रशासन याबाबत योग्य नियोजन करून काम करत असल्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी सांगितले.