पालकमंत्री आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

  • राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांचा शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी होणारा रायगड जिल्हा दौरा जाहीर करण्यात आला आहे. ना. आदिती तटकरे यांच्या या दौ-याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे देण्यात आला आहे.

नागोठणे : महाराष्ट्र राज्य सरकारच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांचा शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी होणारा रायगड जिल्हा दौरा जाहीर करण्यात आला आहे. ना. आदिती तटकरे यांच्या या दौऱ्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे देण्यात आला आहे.

शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वा. सुमारास पालकमंत्री आदिती तटकरे सुतारवाडी (ता.रोहा) येथून गोरेगाव, ता.माणगावकडे प्रयाण होणार आहेत. तसेच दुपारी १.०० वाजताच्या सुमारास गोरेगाव येथे त्यांच आगमन होणार आहे. त्यानंतर निसर्गचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या महाविद्यालयांना खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टमार्फत संगणक व मदत वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर आदिती तटकरे दुपारी २.३० ते ३.०० वा. सुमारास गोरेगाव येथून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत मुंबईकडे प्रयाण होणार आहेत.