rain in mangav

मुंबई गोवा हायवेचे(Mumbai Goa Highway) काम व कोकण रेल्वे दुपदरीकरण(Railway Two lane) यांच्या कामात केलेल्या भरावामुळे माणगाव शहरासह तालुक्यात पूरपरिस्थिती(Flood Situation In Mangav) निर्माण झाली आहे.

    माणगाव : सतत ४ दिवस रायगड जिल्ह्यात (Rain In Raigad District)होणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड प्रशासनाने पुढील ५ दिवस रेड अलर्ट(Red Alert In Raigad) जारी केला आहे. मात्र १८ जुलै रोजी दिवस रात्र झालेल्या पावसाने माणगाव(Mangav) तालुक्यात हाहाकार माजला.मुंबई गोवा हायवेचे(Mumbai Goa Highway) काम व कोकण रेल्वे दुपदरीकरण(Railway Two lane) यांच्या कामात केलेल्या भरावामुळे माणगाव शहरासह तालुक्यात पूरपरिस्थिती(Flood Situation In Mangav) निर्माण झाली आहे.

    माणगाव शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या पटांगणाने तर तलावाचे स्वरूप धारण केले. तर कचेरी रोड, निजामपूर रोड परिसरात रस्त्यावर आलेल्या गुडघाभर पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.  तालुक्यातील काळ नदी,गोद नदी यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. नगरपंचायत हद्दीतील माणगाव रेल्वे स्टेशन परिसरात पाणी जमा झाल्याने नाणोरे गावचा संपर्क तुटला. पुणे दिघी हायवेवर मोरबा साई घाटात दरड कोसळल्याने माणगाव मार्गे श्रीवर्धन वाहतूक बंद करण्यात आली.

    खासदार सुनिल तटकरे यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकीत कोकण रेल्वे काम करणारी कंपनी आणि मुंबई गोवा हायवे चे कन्स्ट्रक्शन करणारी कंपनी यांचे अधिकारी व तालुका प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन पावसाळी पूर्व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची तंबी दिली होती मात्र या कंपन्यांचे अधिकारी यांनी मान्सूनपूर्व कामाकडे कानाडोळा केल्याने माणगावकरांवर ही परिस्थिती ओढवली असल्याचे मत तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.