rain in mahad

आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने महाड तालुक्यातील नदी नाले तुडूंब(Rivers Full In Mahad) भरून वाहू लागले आहेत.

    महाड : महाड(Mahad) तालुक्यात रविवारपासून पावसाने(Heavy RainFall) जोर पकडला आहे. आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने महाड तालुक्यातील नदी नाले तुडूंब(Rivers Full In Mahad) भरून वाहू लागले आहेत.

    प्रतिवर्षी पावसाळ्यात संपूर्ण कोकणात महाड तालुका नैसर्गिक आपत्तीच्या रडारवर लटकत असतो. अतिवृष्टी, महापूर प्रचंड दरडी कोसळणे त्यांतून जिवीत आणि वित्त हानी महाड तालुक्याने कायम सोसली आहे.मात्र वारंवार घडणाऱ्या घटनांना नैसर्गिक आपत्ती म्हणत बेसावध राहणे धोकादायक आहे. निसर्गाच्या कोपापेक्षा मानवी चुकाही त्यासाठी जबाबदार ठरल्या आहेत हे विसरून चालणार नाही म्हणून किमान अतिवृष्टी काळात तरी प्रत्येकाने सुरक्षित ठिकाणी सावध राहणे गरजेच आहे.

    दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाड पोलादपूर तालुक्यातील स्थानिक प्रशासन व शासनाच्या विविध यंत्रणा कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना देवुन दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

    तसेच स्थानिक प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे. सर्व यंत्रणा सतर्क असल्याची माहिती नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली आहे