amba river bridge overflow

सुधागडातील (Sudhagad) आंबा नदीवरील (Amba River)जांभूळपाडा, भेरव,व पाली हे महत्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत.तसेच पेडली गावालगत असणाऱ्या नदीच्या पाणी पातळीत(Water Level Increased) देखील वाढ होताना दिसत आहे.

    पाली : सुधागडात(Sudhagad) आज पावसाने अक्षरशः कहर(Heavy Rainfall) केला आहे. सुधागडातील आंबा नदीवरील (Amba River)जांभूळपाडा, भेरव,व पाली हे महत्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत.तसेच पेडली गावालगत असणाऱ्या नदीच्या पाणी पातळीत(Water Level Increased) देखील वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पेडली गावातील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने तात्काळ या सर्व मार्गांवरील वाहतूक बंद केली असून त्याठिकाणी पोलीस यंत्रणा तैनात केली आहे.नागरिकांना पुराच्या पाण्याच्या जवळ जाण्यास बंदी घातली आहे.

    काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.आज मात्र पावसाने उच्चांक गाठला आहे.त्यामुळे सुधागडात पाणीच पाणी झाले आहे. सुधागडातील काही सखल भागात पाणी साचले असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिल्या आहेत.

    सुधागडात यावर्षीची पावसाची सर्वाधिक नोंद असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.जांभूळपाडा याठिकाणी राहणाऱ्या  रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.तसेच जांभूळपाड्यातुन माणगाव,मानखोरे याठिकाणच्या गावांकडे जाणारा मार्गदेखील तूर्तास बंद करण्यात आला आहे.तालुक्यातील दरडी कोसळणे,भुस्खलन होणे अशा प्रकारच्या घटनांकडे तालुका प्रशासन लक्ष ठेऊन आहे.तसेच कोणीही नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.