महाड तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ : भात शेतीचं प्रचंड नुकसान

शनिवारी अखेर परतीच्या पावसानी महाड तालुक्यात ( Mahad taluka) अक्षरशः धुमाकुळ घातला. तब्बल ६७ मि.मी. सह शनिवारी संपूर्ण रायगड जिल्हयात सर्वाधिक पावसाची (Heavy rains ) नोंद महाड तालुक्यात झाली. प्रचंड विजांच्या आणि ढगांच्या कडकडाटा सह संपूर्ण तालुकाच हादरुन गेला होता. दरम्यान शनिवारी कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यांतील तयार भात पिकांची अक्षरशः नासाडी (Huge damage to paddy fields) झाली आहे.

महाड : शनिवारी अखेर परतीच्या पावसानी महाड तालुक्यात ( Mahad taluka) अक्षरशः धुमाकुळ घातला. तब्बल ६७ मि.मी. सह शनिवारी संपूर्ण रायगड जिल्हयात सर्वाधिक पावसाची (Heavy rains ) नोंद महाड तालुक्यात झाली. प्रचंड विजांच्या आणि ढगांच्या कडकडाटा सह संपूर्ण तालुकाच हादरुन गेला होता. दरम्यान शनिवारी कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यांतील तयार भात पिकांची अक्षरशः नासाडी (Huge damage to paddy fields) झाली आहे. शेतातील तयार उभी भात पिक आडवी झाली असून ढोपरभर पाण्यात ती दबली आहेत. यामुळे बळी राजाच्या डोळ्यात अश्रृ तरळत असून शासनानी महाड तालुक्यांत तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी बळीराजा करित आहेत.

गेली काही दिवस ऑक्टोबर हिटचे चटके चांगलेच जाणवत होते. प्रतिवर्षी पावसाच आगमन आणि परतीचा पाऊस वाजत गाजत जातो हे होत असत. मात्र शनिवारी परतीच्या पावसानी कधी नाही एवढा कहर केला. सांयकाळी ढगांच्या आणि विजांच्या गडगडाटासह सुरु झालेला पाऊस एखाद तास बरसेल अस वाटल होत. मात्र तो तब्बल सात ते आठ तास कोसळतच राहिल्याने तयार झालेली हलवी गरवी जातीची भात पिक अक्षरशा शेतात आडवी होत ती तरंगत होती. काल फक्त ७ ते ८ तासांत ६७ मि मी . पावसाची नोंद झाली. संपूर्ण रायगड जिल्हयात शनिवारी सर्वाधिक पाऊस महाड आणि पोलादपूर तालुक्यात नोंदला गेला यामुळे तालुक्यांत भात शेतीच नक्की किती नुकसान झाल ते सांगता येण कठीण आहे.

हवामान खात्यानी दि ७ ते १० ऑक्टोंबर दरम्यान परताच्या पावसाचा अंदाज सांगितला होता तो खरा ठरला. महाड तालुक्यात आता पर्यंत ३१९० मि . मी वार्षिक सरासरी पावसाची आता पर्यत नोंद झाली आहे तर ती मागील वर्षाच्या तुलनेत ९४ % झाली आहे. अजून एखाद दोन दिवस अशाच प्रकारचा पाऊस कोसळल्यास महाड तालुक्यांतील शंभर टक्के भात शेती उध्वस्त होऊु शकते. त्यामुळे शासनाला किमान महाड तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावाच लागेल हे क्रम प्राप्त आहे.

भाताच कोठार समजलं जाणाऱ्या रायगड जिल्हा आणि संपूर्ण कोकण हे भात शेतीच प्रमुख व्यवसाय म्हणून मानल जात. येथील भात शेतीही मुख्यत्वे पावसाच्या लहरी पणावर अवलंबून असते येथे अनेक वेळा ओला दुष्काळ पडला आहे परंतु येथील शेतकरी इतर मोल मजुरी करून आपली उपजिवीका भागवत असतो परंतु कधी तो आत्महत्या करित नसतो म्हणून शासनानी याकडे दुर्लक्ष करू नये वेळे प्रमाणे ओला दुष्काळ जाहिर करून शेतक -यांना दिलासा देण गरजेच आहे.