सुतारवाडीत पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी, पंचक्रोशितील जनजीवन विस्कळीत

२३ सप्टेंबर पासुन पुन्हा एकदा सकाळ पासूनच पावसाने मोठ्या प्रमाणावर (Heavy rains in Sutarwadi)  पडायला सुरवात केल्यामुळे पंचक्रोशितील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

सुतारवाडी : गेल्या १५ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने एक दोन दिवस विश्रांती घेतली होती मात्र २३ सप्टेंबर पासुन पुन्हा एकदा सकाळ पासूनच पावसाने मोठ्या प्रमाणावर (Heavy rains in Sutarwadi)  पडायला सुरवात केल्यामुळे पंचक्रोशितील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे येथील भात शेती (Crops) संकटात आली असून काही ठिकाणी तर करपा रोग पडल्याचे येथील शेतामध्ये दिसत आहे. चांगली आलेली भात पिक करपा रोगाच्या भक्ष स्थानी जात असल्यामुळे शेतकऱ्याला चिंता लागलेली आहे.

३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात शेतकरी वर्ग अद्यापही सावरलेला नसून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे त्याच्या चिंतेत अधिक वाढ झालेली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अन्य शेतात करपा रोग पडला तर खायचे काय, गुरांसाठी चारा कुठून आणणारा असा ज्वलंत प्रश्न बळीराजाला पडला आहे.