कोलाड बाजारपेठेत मासे पकडण्याच्या जाळ्याना मोठी मागणी

सुतारवाडी - ३० जून पासूनच पावसाने तुरळकपणे सुरुवात केली. तेव्हा पासून कधी पाऊस तर कधी ऊन असा पावसाचा लपंडाव सुरू आहे. मात्र पावसाच्या या लपंडावामुळे खवय्यांची मोठी चंगळ झाली आहे. मासे पकडण्यासाठी

सुतारवाडी – ३० जून पासूनच पावसाने तुरळकपणे सुरुवात केली. तेव्हा पासून कधी पाऊस तर कधी ऊन असा पावसाचा लपंडाव सुरू आहे. मात्र पावसाच्या या लपंडावामुळे खवय्यांची मोठी चंगळ झाली आहे. मासे पकडण्यासाठी लागणारे साहित्य सध्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून गिऱ्हाईक सुद्धा खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. कोलाड नाक्यावरील श्री राजेंद्र पुंडलिक वडे यांच्या दुकानामध्ये मासे पकडण्यासाठी सफेद,  निळा,  पिवळ्या रंगाचे पाग उपलब्ध झाले आहेत.

एका पागाची किंमत रुपये १००० तर जर्मनी कांडर पाग रुपये २५० ते ४५० रुपयांमध्ये उपलब्ध असल्याचे राजेंद्र वडे  यांनी सांगितले. दरवर्षी या पागांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या वर्षी कोरोनामुळे मुंबईसह विविध शहरांतून नोकरीनिमित्त गेलेले कुटुंब आपल्या गावाकडे आले आहेत. गेले चार महिने घरातच बसून कंटाळा आल्याने वल्गनीचे  मासे व मुठे पकडण्यासाठी पाऊस जोरात पडला की अनेक जण घराबाहेर पडतात. सुतारवाडी दशक्रोशिमध्ये लहान मोठ्या नद्या,  नाले,  तसेच धरण असल्यामुळे नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे मिळतात.

हे मासे पकडण्यासाठी अनेकांनी पाग खरेदी केले असून पकडून आणलेले मासे खाण्यात मजा काही औरच असते असे मंगेश शिंदे यांनी सांगितले. दर वर्षी मुंबई-ठाणे येथील नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर वल्गनीचे मासे व मुठे घेऊन जातात. पण यावर्षी लॉकडाऊन मुळे सर्व गावाकडे असल्याने तिथेच त्यांना दिले असेही त्यांनी सांगितले. कोलाड प्रमाणे रोहा बाजारपेठेतही मासे पकडण्याचे पाग उपलब्ध असून खरेदी करण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत.