short film oneone

महाड: लोकस्वराज्य फिल्म आणि टेलिव्हिजन ट्रेड यूनियन भारत आणि रसिका थेएटर्स यांचा संयुक्त विद्यमाने  स्वातंत्र्य दिनानिमित्त एकपात्री, द्विपात्री आणि शॉर्टफिल्म स्पर्धा(short film competition) महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेत आपल्या महाडचे सुपुत्र हिमांशु सुर्वे यांनी लिहीलेल्या आणि दिग्दर्शत केलेल्या ‘वनवन’  या पाण्याचे महत्व पटवुन देणाऱ्या शॉर्टफिल्मने स्पर्धेत अव्वल येत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावुन महाडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

महाड: लोकस्वराज्य फिल्म आणि टेलिव्हिजन ट्रेड यूनियन भारत आणि रसिका थेएटर्स यांचा संयुक्त विद्यमाने  स्वातंत्र्य दिनानिमित्त एकपात्री, द्विपात्री आणि शॉर्टफिल्म स्पर्धा(short film competition) महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. पाणी आणि देशभक्ती हे या स्पर्धेचे प्रमुख विषय होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक कलाकारांनी भाग घेतला होता, या स्पर्धेचा निकाल काही दिवसांपुर्वी ऑनलाइन जाहीर झाला या स्पर्धेत आपल्या महाडचे सुपुत्र हिमांशु सुर्वे यांनी लिहीलेल्या आणि दिग्दर्शत केलेल्या ‘वनवन’  या पाण्याचे महत्व पटवुन देणाऱ्या शॉर्टफिल्मने स्पर्धेत अव्वल येत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावुन महाडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सोशल मीडिया आणि समाजमाध्यमातुन त्याचे खुप कौतुक होत आहे.

यात मुख्य कलाकार म्हणून श्रेयस सुर्वे या महाडच्या कलाकाराने काम केले असुन त्याच्या अभिनयाचे सुद्धा कौतुक होत आहे, या शॉर्टफिल्मची सिनेमॅटोग्राफी प्रथमेश सावंत तर एडिटिंग आकाश शिंदे या महाडच्याच कलाकारांनी केले आहे..मुख्य म्हणजे ही संपूर्ण शॉर्टफिल्म मोबाईलवर चित्रीत करण्यात आली आहे. नुकताच जाहीर झालेल्या निकालानंतर ही शॉर्टफिल्म Himanshu Surve या YouTube चॅनलवर दर्शकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.