होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्या नागरिकांचा श्रीवर्धनमध्ये मुक्त वावर

श्रीवर्धन : रायगड जिल्हात कोरोनाचे रुग्ण वाढले असुन पनवेल येथे कोरोनाने हातपाय पसरल्यामुळे पनवेल व उरण हे दोन तालुके रेड झोनमध्ये आहेत. पनवेल शेजारी असल्याने रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी

 श्रीवर्धन : रायगड जिल्हात कोरोनाचे रुग्ण वाढले असुन पनवेल येथे कोरोनाने हातपाय पसरल्यामुळे पनवेल व उरण हे दोन तालुके रेड झोनमध्ये आहेत. पनवेल शेजारी  असल्याने रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी अधिक घेणे नितांत गरजेचे आहे. रायगड जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने काही दिवसांमध्ये रायगड जिल्हा पुरत्या काही सोईसुविधा थोड्या अधिक प्रमाणात सुरु होण्याच्या दाट शक्यता नाकारता येत नाही. मात्र अजूनही काही नागरिक कोरोनाचे महाभयंकर संकट गांभीर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्याची मुंबई व्हायला आता वेळ लागणार नाही असे म्हणावे लागेल. 

शासनाने मुबंई येथे अडकून पडलेल्या चाकरमान्यांना आपल्या गावी कोकणात जाण्याची मुभा दिली खरी पण ती आता गावातील नागरिकांना डोकेदुखी होऊ लागली आहे. कारण मुंबईहुन श्रीवर्धन तालुक्यातील आलेल्या चाकरमान्यांना होम क्वारंटाईन करून त्यांना त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. परंतु काही नागरिक
आम्हाला काहीच झाले नाही. फक्त आमच्या हातावर एक होम क्वारंटाईनचा शिक्का मारला आहे, असे सांगत इतरांना शहाणपणा शिकवत रस्त्यावर तसेच खेड्यापाड्यातील , आळी, पाखाडीमध्ये गावागावात प्रशासन व गावातील नागरिकांना चकवा देत फिरताना दिसतात. यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमध्ये भातीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच चोरट्या मार्गने  प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकत मुंबई व पुणे कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या रेड झोनमधून काही नागरिक चालत येत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातील काही नागरिक स्वतःहून पुढे येवून उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन या ठिकाणी तपासणी करून घेतात. काही जण गुपचूप आपल्या घरी जाणे पसंत करतात. यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून होम क्वारंटाईन केलेले पण रस्त्यावर व गावामध्ये फिरणारे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमधून केली जात आहे.