कोविड-१९ महामारीमध्ये जनतेची सुरक्षा  करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा सन्मान 

सोसायट्यांमधील जनतेची सेवा केल्याबद्दल सुरक्षारक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. सोसायटी हद्दीत कोरोना प्रभाव वाढू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी दिवस-रात्र काळजी घेऊन काम केले याबद्दल सुरक्षा रक्षकांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.

पेण : कोविड-१९ या महामारीच्या काळात केलेली अनेक सोसायट्यांमध्ये हॉट सिक्युरिटी सर्व्हिसेस (security guards) मार्फत लॉकडाऊन मध्ये ही उत्तम सेवा देण्याचे काम करण्यात आल्याबद्दल हॉट सिक्युरिटीचे मालक भरत साळवी यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पेन शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये कोरोना पेशंट ची वाढ होत असताना सुद्धा हॉट सिक्युरिटी (Hot Security) ने बिंदास सर्विस देऊन व येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रत्येकाची इंट्री करून सोसायटी अध्यक्ष व सेक्रेटरी यांना आलेल्या गेलेल्यांची माहिती कळवली आहे.

याचे सर्व श्रेय हॉट सिक्युरिटी यांना जात असून त्यांनी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा चांगली सेवा दिली आहे. सोसायट्यांमधील जनतेची सेवा केल्याबद्दल सुरक्षारक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. सोसायटी हद्दीत कोरोना प्रभाव वाढू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी दिवस-रात्र काळजी घेऊन काम केले याबद्दल सुरक्षा रक्षकांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. सोसायटी मधील जनतेला कोरोना विषाणूचा संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी जनतेची केलेली सेवा याबद्दल हॉट सिक्युरिटीने उत्तम काम केले आहे.

याबद्दल सुरक्षारक्षकांचा सार्थ अभिमान आहे.  व याबद्दल सुरक्षारक्षकांचा आमच्या मनात नितांत आदर प्रेम असल्यामुळे अनेक सोसायटीमधील सुरक्षारक्षकांचा सत्कार केला आहे. तसेच अनेक सोसायट्यांमध्ये सभेत अभिनंदनाचा ठराव होऊन कृतज्ञ दर्शक ,प्रतीकात्मक सन्मानपत्र हॉट सिक्युरिटी चे मालक भरत साळवी यांच्याकडे सन्मानपत्र देण्यात आले आहे.