death in a car

आज सायंकाळी मुंबई - गोवा महामार्गालगत महाड औद्योगिक वसाहतीच्या  येथे एका बंद होंडा सिटी कारमध्ये गुदमरून दोन सख्ख्या चिमुरड्या भावांचा मृत्यू झाला(two children dead in a car) आहे. या घटनेबाबतची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस सुत्रांनी दिली आहे.

महाड : आज सायंकाळी मुंबई – गोवा महामार्गालगत महाड औद्योगिक वसाहतीच्या  येथे एका बंद होंडा सिटी कारमध्ये गुदमरून दोन सख्ख्या चिमुरड्या भावांचा मृत्यू झाला(two children dead in a car) आहे. या घटनेबाबतची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस सुत्रांनी दिली आहे.

सोहेल जकात खान(वय ५ वर्ष) आणि अब्बास जकात खान(वय ३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.या घटनेची हकीगत अशी की, नांगलवाडी येथे एक भंगाराचा अड्डा आहे येथे एक होंडा सिटीकार नंबर एम एच . o४ बि. के . ७५३७ ही बंदकार उभी होती या कारमध्ये ७ वाजण्याच्या सुमारास खेळत असताना अब्बास व सोहेल यांच्या हातून अचानक गाडीचा दरवाजा आतून लॉक झाला. या दोघांनाही बंद गाडीचे दरवाजे आणि काचा उघडणे जमले नाही. यामुळे गाडीमध्ये  गुदमरून त्या दोघांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती समजताच औद्योगिक वसाहत पोलिसांनी आणि साळुंके रेस्क्यू टीमचे प्रशांत साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेत या दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले आहेत. याप्रकरणी औद्योगिक पोलीस ठाण्यात या दोन मुलांच्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करित आहेत. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.