खुरावले फाटा ते कुंभारघर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे झालेले काम किती दिवस टिकणार? नागरिकांमधून तीव्र नाराजीचे सूर….

पाली : सुधागडातील खुरावले फाटा ते कुंभारघर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ठ दर्जाचे व ढगळमपट्टी पद्धतीने करण्यात आले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.खुरावले फाटा ते

पाली : सुधागडातील खुरावले फाटा ते कुंभारघर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ठ दर्जाचे व ढगळमपट्टी पद्धतीने करण्यात आले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.खुरावले फाटा ते कुंभारघर रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन दोन वर्षे झाली असून सध्यस्थितीत रस्त्याचे काम हे पूर्णत्वास आले आहे.परंतु पहिल्या चार दिवसाच्या पावसातच रस्त्याने कमाल केली आहे. जागोजागी हलकी व अवजड वाहने खचताना दिसून येत आहेत. याचे कारण करण्यात आलेले रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे काम. रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेले निकृष्ठ दर्जाचे मटेरियल. तसेच रस्ता प्रक्रियेत अवलंबण्यात आलेले चुकीची पद्धत. रस्त्याच्या कामात कोठेही आराखड्या प्रमाणे प्रक्रिया करण्यात आली नाही. एकूण सात मीटर रुंदीचा रस्ता त्यात पाच मीटरचा रस्ता व दोन मीटर ची साईडपट्टी परंतु रस्त्याला ४ किमीच्या अंतरात कोठेही साईडपट्टी आढळून येत नाही. त्यामुळे रस्ता हा साईडपट्टी लगत खचण्यास सुरुवात झाली आहे.       

रस्ता प्रक्रियेत कुठेही बीबीएम,डब्लूबीएम,अशा पद्धतीचा अवलंब करण्यात न आल्याने रस्त्याची अशी अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.रस्ता भारावासाठी काही ठिकाणी शेतातील माती,नदीतील पुळण वापरण्यात आली असून त्यावर पाणी मारून व्यवस्थितरीत्या दबाई करण्यात आली नाही.असे देखील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक निधीतून २कोटी ४९लाख एवढा निधी मिळून सुद्धा रस्ता कुचकामी ठरत असल्याचे सध्याच्या रस्त्याच्या परिस्थिती वरून दिसून येत आहे. रायगडात तसेच संबंध कोकणात पावसाचे प्रमाण हे खूप असते त्यामुळे पुढील काळात रस्ता तिकतो कि नाही ? की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा निधी रस्त्यासोबत पाण्यात वाहून जातो का हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.     

या रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिक व ग्रामस्थ वारंवार प्रशासनाला व संबंधित इंजिनिअर्सला रस्त्याची परिस्थिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून निदर्शनास आणून देत असूनसुद्धा याबाबत गांभीर्यता घेण्यात आली नसल्याचे तरी एकंदरीत दिसून येत आहे. सदरच्या रस्त्याचे काम हे अष्टविनायक कंस्ट्रक्शन या ठेकेदाराला दिले असून त्याने सबकॉन्ट्रॅक्टरला दिले आहे. सुधागडातील बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे रस्त्याची कामे आली असून एकही काम पूर्णत्वास आले नाही.ठेकेदारांच्या या अशा मुजोर पणामुळे रस्त्यांची कामे हि निकृष्ठ दर्जाची होत चालली असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.