सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची शंभरी पार, ३ जणांचा मृत्यू

तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल ११५ रुग्ण आहेत. आत्तापर्यंत कोरोनाचे ७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पाली : सुधागड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  गुरुवारी (दि.२०) तालुक्यात १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून एकाच मृत्यू झाला आहे. तालुक्यात पालीमध्ये सर्वाधिक ३४ रुग्ण असल्याने पालीकरांच्या चिंतेत वाढ होत आहे.

तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल ११५ रुग्ण आहेत. आत्तापर्यंत कोरोनाचे ७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे देखील आवाहन तहसीलदार रायन्नावर यांच्या कडून करण्यात आले आहे.