नंदा म्हात्रे यांच्या उपोषणाला ग्रामस्थांचा पाठींबा

पेण: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट भागाच्या नशिबी मागील अनेक दशके पाणीबाणीच आलेली आहे. ठेकेदार आणि अधिकारी वर्गाची उदासीनता अशी पाण्याबाबतची असणारी साडेसाती या ग्रामस्थांना आजही भेडसावत

पेण: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट भागाच्या नशिबी मागील अनेक दशके पाणीबाणीच आलेली आहे. ठेकेदार आणि अधिकारी वर्गाची उदासीनता अशी पाण्याबाबतची असणारी साडेसाती या ग्रामस्थांना आजही भेडसावत असून अधिकारी,ठेकेदार आणि राजकीय नेत्यांनी आश्वासने देऊनही या भागातील पाण्याच्या समस्या सुटत नसल्याने अखेर या भागातील नंदा म्हात्रे या महिलेने आजपासून म्हणजेच २९ जूनपासून पेण तहसील कार्यालया समोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून नंदा म्हात्रे यांना येथील दिलीप पाटील आणि संदेश ठाकूर यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे.
 म्हात्रे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पेण पंचायत समितीच्या सभापती सरिता म्हात्रे, उपसभापती सुनील गायकर, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल, राजन झेमसे, प्रमोद म्हात्रे, किरण मात्रे, गोरख पाटील, राजेंद्र मात्रे, सी.आर.पाटील सर यासह  संपूर्ण खारेपाट भागातील जनता हजर होती.तसेच खारेपाटातील जनता आपल्या पाठीशी असल्याचे नंदा म्हात्रे यानी सांगितले .
 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एका सक्षम विशेष अधिकाऱ्याची पूर्णवेळ नेमणूक करावी, पाणीपुरवठा योजनेत चालढकल करून जनतेचा अमानुष छळ केल्याबाबत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, शहापाडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करावी, सिडकोतून खारेपाट विभागाला तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा आणि खारेपाट भागाला पाणी मिळेपर्यंत मुंबईकडे जाणारा पाणी बंद करावा या प्रमुख मागण्या घेऊन हे आमरण उपोषण सुरू असून आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आणि प्रशासनाकडून तसे लेखी पत्र मिळेपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.