sunil tatkare

म्हसळा : गुजरातला गरबा(garba in gujrat) खेळायची परवानगी नसताना महाराष्ट्रात गरबा खेळायची मागणी (demand of garba in maharashtra)कशाला करता असा सवाल करीत खासदार सुनिल तटकरे(sunil tatkare) यांनी भाजपवर निशाणा साधला.

म्हसळा : गुजरातला गरबा(garba in gujrat) खेळायची परवानगी नसताना महाराष्ट्रात गरबा खेळायची मागणी (demand of garba in maharashtra)कशाला करता असा सवाल करीत खासदार सुनिल तटकरे(sunil tatkare) यांनी भाजपवर निशाणा साधला. सध्या राज्य कोरोना महामारीशी लढा देत असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन कोणता खेळ खेळत आहेत, असा सवाल रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज  म्हसळा येथे आयोजित जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ता संयुक्त आढावा सभेत विचारला आहे.

निसर्ग चक्रीवादळात तात्काळ मदत केली म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचे खासदार सुनील तटकरे यांनी आभार मानले. त्याचबरोबर विद्युत विभागाने मोठ्या परिश्रमाने वादळात खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत केला त्याबद्दल विद्युत विभागाचे सुद्धा आभार मानले.नुकताच केंद्र सरकारने जाहीर केलेला कामगार कायदा व कृषी विधेयक घातक असून राज्यात बेरोजगारी वाढेल व शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत राहिली आहे आणि भविष्यातही शेतकर्‍यांच्या हिताचेच निर्णय घेणार असे खासदार तटकरे यांनी सांगितले.

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे छातीठोकपणे सांगणारे आणि पवार साहेबांचा पक्ष राहणार नाही असे भाकित करणारे आता कुठे आहेत हे राज्यातील जनता पाहत आहे. महाविकास आघाडीची मोट बांधत पवार साहेबांनी साऱ्या देशाला थक्क करीत महाराष्ट्रातील जनतेला एक प्रकारे सुखद धक्का दिला आहे. कोरोनाचे संकट असतानाही महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे याचे पोटशूळ विरोधी बाकांवर बसलेल्यांना येत असून नेहमीच राज्य सरकारला डिवचण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे असेही खासदार तटकरे यांनी सांगितले.

म्हसळा तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात व ग्रामीण रुग्णालयातील सोयी सुविधांच्या बाबतीत तालुक्यातील पत्रकारांनी माझी भेट घेऊन प्रश्न मांडले असता मी राज्याचे आरोग्य मंत्री यांच्यासोबत चर्चा केली असून काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तालुक्यातील पत्रकारमित्र आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत काही समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या संदर्भात देखील संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांचेसोबत चर्चा केली असून येणाऱ्या कालखंडात हे रस्ते देखील सुस्थितीत केले जातील. त्याचबरोबर भविष्यात या मतदारसंघाच्या आमदार आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याकडे पर्यटन राज्यमंत्री हे खाते असल्यामुळे या सर्व परिसरात धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन व इतर खात्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या विकासात्मक योजना राबवून येथील तरुणांना याचठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल असे खासदार तटकरे यांनी आश्वासित केले.

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेच्या मतरुपी आशीर्वादाने आमदार झाली आणि आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने राज्याची राज्यमंत्री झाले असून सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक बांधणीत पक्ष वाढीसाठी विशेष लक्ष देत असतानाच राज्य सरकार मधील मंत्री म्हणून या सर्व परिसरात अधिकाधिक विकासात्मक धोरण राबवून तरुणांसाठी विविध प्रकारच्या योजना अंमलात आणून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

यावेळी आयोजित सभेला खासदार सुनिल तटकरे यांसह राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ लाड, जिल्हा युवक अध्यक्ष अंकीत साखरे, प्रदेश सरचिटणीस अलिशेठ कौचाली, राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिप सभापती गीताताई जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्या धनश्री पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा गीताताई पालरेचा आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थितत होते.