If you are planning to visit Matheran, Alibag, then wait ... read this news first then plan what

ब्रिटनमध्ये करोनाचा नविन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून ही संचारबंदी लागू झाली आहे. याच धर्तीवर आता रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे.

रायगड : सगळ्यांनाच आता ख्रिसमस आणि नविन वर्षाच्या व्हेकेशनचे वेध लागले आहेत. जर, तुम्ही माथेरान, अलिबागला फिरायला जाण्याचा बेत असेल तर आधी सर्व नियम चेक करा आणि मगच प्लानिंग करा.

ब्रिटनमध्ये करोनाचा नविन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून ही संचारबंदी लागू झाली आहे. याच धर्तीवर आता रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे.

जिल्ह्यात पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. करोनासंबंधित नियमांचे उल्लघन करणाऱ्या हॉटेल, रेस्तराँ आणि रिसॉर्टवर सात दिवसांची बंदीची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

रायगड जिल्ह्यातील माथेरान, अलिबाग यांसारख्या पर्यटनस्थळांना पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे या पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊन नंतर पर्यटन स्थळांवरील बंदी हटवल्यावर मांडवा, किहीम, अलिबाग, नागाव, आक्षी, रेवदंडा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर आणि माथेरान येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. येथे येणारे पर्यटक हे प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या महानगरातील आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून रात्रीची संचारबंदी लागू कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.