अवैध गावठी दारुची वाहतूक करणारी गाडी पाठलाग करून पकडली

पनवेल : अवैध गावठी दारुची वाहतूक करणार्‍या इको गाडीचा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ पनवेलने पाठलाग करून ही गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये १४०० लीटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. राज्य

पनवेल : अवैध गावठी दारुची वाहतूक करणार्‍या इको गाडीचा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ पनवेलने पाठलाग करून ही गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये १४०० लीटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ पनवेलचे निरिक्षक एस.एस.गोगावले यांना खबर्‍याकडून  बातमी मिळाली की, मौजे मुंबई-गोवा हायवे पळस्पे फाटा येथे गावठी दारुची वाहतूक होणार आहे. त्यानुसार त्यांनी सापळा लावला असता मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी क्र.एमएच-०५-सीएम-३५५२  थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी भरधाव टाकल्याने सदर गाडीचा पाठलाग करण्यात आला असता ही गाडी अलिबाग कोळीवाडा येथे पकडली असता अंधाराचा फायदा घेत हा गाडी चालक पळून गेला. या गाडीमध्ये असलेल्या गावठी दारुने भरलेला रबरी ट्युबा आणि  मारुती सुझुकी इको गाडी  असा मिळून जवळपास ४ लाख ३७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी फरार  झालेल्या आरोपीचा शोध करीत आहेत. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबईचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, अधिक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.एस.गोगाावले, दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड, जवान पालवे, राणे, नरेश गायकवाड, जवान झिंटे, मनोज भोईर, अनंत जगदांडे आदींच्या पथकाने सहभाग घेतला होता. याबाबत अधिक तपास दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत.