पनवेल टिळक रोड येथे महावितरणाची तात्काळ  कार्यतत्परता, विद्युतवाहिनीला अडथळा ठरणाऱ्या फांद्या त्वरित छाटल्या

पनवेल - पनवेल शहरातील टिळक रोड येथील महावितरणाच्या जिवंत विद्युत वाहीनीच्या तारांवर झाडांच्या फांद्या सध्या वादळी वारा सुरू असल्याने अडकल्याने त्याचे घर्षण होत होते. ही बाब तेथील जागृत

 पनवेल – पनवेल शहरातील टिळक रोड येथील महावितरणाच्या जिवंत विद्युत वाहीनीच्या तारांवर झाडांच्या फांद्या  सध्या वादळी वारा सुरू असल्याने अडकल्याने त्याचे घर्षण होत होते. ही बाब तेथील जागृत नागरीकांच्या लक्षात आल्याने पनवेल महावितरणाचे अती कार्यकारी अभियंता  पनवेल शहर उपविभागाचे नानोटे यांच्या कानावर ही बाब लक्षात आणुन दिली. नानोटे यांनी क्षणाचाही विलंब न करता पाऊस सुरू असताना देखील त्वरीत आपल्या कार्यालयातुन कर्मचारी पाठवुन झाडाच्या विद्युत वाहीनीमध्ये अडकलेल्या फांद्या काढुन व उरलेल्या अडथळा ठरणार्या फांद्या कर्मचारी  यांनी छाटल्याने टिळक रोड परीसरातील विद्युत प्रवाह खंडित होण्याचा व शॉर्ट सर्कीट होण्याचा संभाव्य धोका टळल्याने व नानोटे यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने नागरीकांत समाधान व्यक्त  केले जात आहे