पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवार ३१ मे रोजी ६७ नवीन रुग्ण सापडले. आज अलिबाग, म्हसळा आणि महाड मध्ये कोरोंनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून कोरोंनावर २७ जणांनी मात केली आहे.

पनवेल  : रायगड जिल्ह्यात   रविवार ३१  मे रोजी ६७  नवीन रुग्ण सापडले. आज अलिबाग, म्हसळा आणि महाड मध्ये कोरोंनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून कोरोंनावर २७ जणांनी मात केली आहे. रायगड  जिल्ह्यात  कोरोंनाच्या  रुग्णांची संख्या १११७  झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल तालुक्यातील ७२९ रुग्णांचा समावेश आहे  जिल्ह्यात मृतांची संख्या ५०  झाली आहे.  

            रायगड जिल्ह्यात रविवारी  कोरोंनाचे ६७  नवीन रुग्ण सापडले आहेत. आज अलिबाग , म्हसळा आणि महाड मध्ये कोरोंनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  पनवेल तालुक्यात सर्वाधिक ४०  रुग्ण असून यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील ३० , ग्रामीण मधील १० रुग्णांचा समावेश आहे. आज म्हसळा १०, मुरुड ४, तळा ४ ,उरण ३,माणगाव २,आणि अलिबाग, रोहा, कर्जत आणि महाड मध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत.

     रायगड जिल्ह्यात रविवार  पर्यंत  ३८८२  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १११७   पॉझिटिव्ह आल्या आहेत११९ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर ६१६ जणांनी मत केली असून ४५१ रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ५० जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.