सुधागड तालुक्यात ४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद, १४ जणांची कोरोनावर मात

सुधागड तालुक्यात आता कोरोनाचे ३२८ रुग्ण झाले असून आत्तापर्यंत कोरोनाचे २५२ रुग्ण बरे झाले आहेत.

पाली : सुधागड तालुक्यात (Sudhagad taluka,)  सोमवारी (दि.१४) ४ कोरोना पॉझिटिव्ह (corona infected) रुग्ण सापडले आहेत. तर १४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सुधागड तालुक्यात आता कोरोनाचे ३२८ रुग्ण झाले असून आत्तापर्यंत कोरोनाचे २५२ रुग्ण बरे झाले आहेत.

तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली आहे. प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य आणि नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी केले आहे.