garbhat primary health centre

सुतारवाडी: प्राथमिक उपकेंद्र(primary health centre) गारभट चिंचवलीतर्फे आतोणेचे उद्घाटन(inaugaration) आज रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे(aditi tatkare) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, सरपंच मंजुळा काटकर, सभापती रोहा पंचायत समिती  गुलाब वाघमारे, रोहा पंचायत समिती सदस्य वीणा चितळकर, जिल्हा परिषद सदस्य दयाराम पवार, पंचायत समिती सदस्या सिद्धी राजिवले, गटविकास अधिकारी डॉक्टर राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण, डॉक्टर अंकिता भोईर, गारभट चे उपसरपंच संजय मोते, माजी सरपंच नाना शिंदे, ग्रामसेवक  देसाई, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, गारभट येथील हे आरोग्य उपकेंद्र दुर्गम डोंगराळ भागात असून अशा कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य उपकेंद्र झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल. उपकेंद्र स्तरावर समुदाय अधिकारीपद लवकरात लवकर भरण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितले. त्याप्रमाणे आरोग्यसेविका पद रिक्त आहे ते सुद्धा लवकर भरण्यासंबंधी सांगितले.