सुधागड तालुक्यात ९ कोरोना रुग्णांची वाढ

पाली : सुधागड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.२१) तालुक्यात पुन्हा ९ कोरोना  बाधितांची भर पडली असून कोरोना बाधितांची संख्या एकूण १२४ वर पोहोचली आहे.तर आजच्या दिवशी ५ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात रोजच्या वाढणाऱ्या रुग्ण संख्येने सणा सुदीच्या दिवसात लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. 

तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल १२४ रुग्ण आहेत. आत्तापर्यंत कोरोनाचे ७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे देखील आवाहन तहसीलदार रायन्नावर यांच्या कडून करण्यात आले आहे.
.