श्रीवर्धन तालुक्यात नवीन पाच कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

श्रीवर्धन तालुक्यात मागील आठ दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची मालिका जवळजवळ बंद झाली होती. तब्बल तीन ते चार दिवस एकही रुग्ण सापडला नव्हता. तर सापडलेल्या रुग्णांची संख्या दोन किंवा एक अशी होती.

तालुक्यात सात जाण कोरोनामुक्त

 श्रीवर्धन :  श्रीवर्धन तालुक्यात मागील आठ दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची मालिका जवळजवळ बंद झाली होती. तब्बल तीन ते चार दिवस एकही रुग्ण सापडला नव्हता. तर सापडलेल्या रुग्णांची संख्या दोन किंवा एक अशी होती. परंतु आज श्रीवर्धन तालुक्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामधील एक रुग्ण हा तालुक्यातील कुडकी या गावातील आहे. तर श्रीवर्धन शहराजवळ असलेल्या आरावी व वाळवटी या दोन गावांमध्ये एक रुग्ण सापडला असून जसवली येथे देखील एक रुग्ण सापडला आहे. तर बोर्लिपंचतन गावात एक रुग्ण सापडला आहे. 

आज बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये एक रुग्ण बोर्लिपंचतन येथील आहे, तर उर्वरित सहा रुग्ण श्रीवर्धन शहरातील आहेत. श्रीवर्धन तालुक्यात आत्तापर्यंत १६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी १४१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर चौदा जण कोरोना वरती उपचार घेत आहेत व नऊ जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. येणाऱ्या गोकुळाष्टमी व गौरीगणपती सणासाठी खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तुटत आलेली कोरोनाची साखळी पुन्हा वाढते की काय अशी शंका निर्माण होत आहे. सण आहे म्हटल्यावर नागरिक खरेदीसाठी येणार पण पोलिसांनी सोशल डिस्टंसिंग कंपल्सरी करायला लावल्यास साखळी तुटायला मदत नक्कीच होईल. तरी श्रीवर्धन पोलिसांनी श्रीवर्धन बाजारपेठेत अतिरिक्त पोलीस तैनात करून प्रत्येक दुकानांसमोर सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात यावे, याबाबत कटाक्षाने काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.