उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे स्वातंत्र्य  दिन साजरा

श्रीवर्धन  : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनी उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .ध्वजारोहणा नंतर  रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली .संपूर्ण कार्यक्रम सोशल डिस्टेंसिन्ग चे पालन करत तोंडाला मास्क लावून संपन्न झाला .या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ भरणे, डॉ अली, डॉ रामदास, नेत्रचिकित्सा अधिकारी सलीम ढालाईत तसेच अधिपरीसेवीका, अधिपरिचारिका, ब्रदर्स , फार्मासिस्ट ,टेकनिशियन लेखनिक ,कर्मचारी वर्ग उपस्थति होते.कार्यक्रमासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क लावून सोशल डिस्टनसिंगचे पालन केले. कोरोना महामारीच्या संकटामुळे कार्यक्रम अतिशय साधेपणात साजरा करण्यात आला.