फोटो सौजन्य : साधना राजवाडकर
फोटो सौजन्य : साधना राजवाडकर

कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकल सेवा पूर्ववत करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर हाती घेतले आहे.

    नवी मुंबई (वाशी) : आज विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. पावसामुळे ओव्हरहेड वायर यंत्रणेत अनेक ठिकाणी स्पार्किंग होऊन हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकल सेवा पूर्ववत करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर हाती घेतले आहे.