जे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर

तळीये व सुतारवाडीत जखमी झालेल्यांना जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी दरडीमध्ये सापडल्याने त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. या जखमांना मलमपट्टी करणे आवश्यक होते. मात्र जे.जे. रुग्णालयामध्ये हायड्रोजन पॅराऑक्साईड, पॅरासिटेमॉल इंजेक्शन, २० क्रमांकाचे ब्लेड यासारखे मलमपट्टीसाठी आवश्यक असलेले अनेक औषधे व साहित्यांचा तुटवडा असल्याने डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना आणण्यास सांगण्यात आले.

    रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडीमध्ये कोसळलेल्या दरडीमधील जखमींवर सर्व उपचार मोफत करण्याचे निर्देश जे.जे. रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयांना देण्यात आले होते. मात्र रुग्णांच्या गंभीर परिस्थितीमुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले. मात्र रुग्णालयात असलेल्या औषध तुटवड्यांचा फटका रुग्णांच्या नातेवाईकांना बसला. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

    तळीये व सुतारवाडीत जखमी झालेल्यांना जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी दरडीमध्ये सापडल्याने त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. या जखमांना मलमपट्टी करणे आवश्यक होते. मात्र जे.जे. रुग्णालयामध्ये हायड्रोजन पॅराऑक्साईड, पॅरासिटेमॉल इंजेक्शन, २० क्रमांकाचे ब्लेड यासारखे मलमपट्टीसाठी आवश्यक असलेले अनेक औषधे व साहित्यांचा तुटवडा असल्याने डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना आणण्यास सांगण्यात आले.

    यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी सरकारकडून उपचार मोफत करण्यात येत असल्याबाबत विचारणा केली असता रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात येत होते. त्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांच्या नातेवाईकांना औषधे विकत आणावी लागत होती. रुग्णांना दरडीमधून बाहेर काढल्यानंतर अनेकजण घरातील कपड्यांसह बाहेर पडले होते.

    त्यामुळे त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशावेळी त्यांना औषधे विकत घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. काहींनी मुंबईतील नातेवाईकांना बोलवून त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. त्यामुळे जे.जे. रुग्णालयामध्ये अनेक दिवसांपासून औषधे व साहित्यांच्या तुटवड्याचा फटका दरडग्रस्तांच्या नातेवाईकांनाही सहन करावा लागला.

    जे.जे.मध्ये दाखल ८ जणांची प्रकृती स्थिर

    पाेलादपुर येथील जखमींपैकी ८ जणांची प्रकृती स्थिर असल्याचे जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात अाले. सध्या स्वाती काेंडलकर (२१), रेश्मा चंद्रकांत काेंडलकर (३८), स्वप्निल धाेंडीराम शिरवाले (२६), संगीता काेंडलकर (४१), िनलेश सुतार(२८), सार्थक सुतार(४), भारत सुतार(५०), नितेश सुतार(३२) या अाठही जणांना क़िरकाेळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.