जावळे गावातील बेकायदेशीर गावठी हातभट्टीवर पोलिसांची कारवाई

पनवेल:कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना पनवेल तालुक्यात अवैध धंद्यामध्ये वाढ झाली असून गावठी दारूची भट्टी, दुप्पट दराने दारूविक्री, गुटखा, गांजा विक्री यासारखे धंदे तेजीत आहेत. नवी मुंबई

पनवेल:कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना पनवेल तालुक्यात अवैध धंद्यामध्ये वाढ झाली असून गावठी दारूची भट्टी, दुप्पट दराने दारूविक्री, गुटखा, गांजा विक्री यासारखे धंदे तेजीत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ – २  गुन्हे शाखा कक्ष २ ने मात्र अशा बेकायदेशीर धंदयांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

 नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ – २ मधील गुन्हे शाखा कक्ष २ चे पोलीस नाईक परेश म्हात्रे यांना मिळालेल्या बातमीनुसार पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील जावळे, ता. पनवेल येथे पुंडलिक वामन कडू  हा बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी चालवत असल्याबाबतचे माहिती मिळाली या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड, पोइल्स हवालदार सुनील साळुंखे, सचिन पवार, पोलिस नाईक परेश म्हात्रे, सुनील कुदळे,अभय साबळे यांनी छापा घातला.  यावेळी त्याठिकाणी  २६०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन मिळून आले. तसेच सदर रसायन तयार करण्याकरीता लागणारे इतर साहीत्य विजेची मोटार व वीज कनेक्शनला लागणारे वायर  असा एकूण ६७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गु. र. नं.१९१/२०२० भादवी कलम १८८,  सह महाराष्ट्र दारूबंदी का.कलम ६५(ग) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष २  करीत आहे.