reporter send sms to health minister

आपला संताप व्यक्त करण्यात आला आहे. मराठी पत्रकार परिषदेने या आंदोलनाची हाक दिली होती.या अनुषंगाने कर्जत तालुका पत्रकार संघाच्यावतीने तहसिलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले. व पत्रकारांसाठी घोषणा केली त्याप्रमाणे त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली.

कर्जत : महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतरही राज्यातील कोरोना बळी पत्रकारांच्या (Journalists )कुटुंबियांना ना पन्नास लाखांची मदत मिळाली ना पत्रकार विमा योजना सुरू केली गेली. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असून तो व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी राज्यातील पत्रकार आरोग्य मंत्र्यांना (health ministers) हजारो एसएमएस पाठवून ( protested by sending thousands of SMS) व जिल्हाधिकारी तहसीलदार याच्या कार्यालयासमोर निर्दशने करून

आपला संताप व्यक्त करण्यात आला आहे. मराठी पत्रकार परिषदेने या आंदोलनाची हाक दिली होती.या अनुषंगाने कर्जत तालुका पत्रकार संघाच्यावतीने तहसिलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले. व पत्रकारांसाठी घोषणा केली त्याप्रमाणे त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना “कोरोना योद्धे” असलेल्या पत्रकाराचं कोरोनानं निधन झालं तर त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र राज्यात आतापर्यंत २५ पत्रकारांचे बळी कोरोनानं घेतले असले तरी एकाही पत्रकाराच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची काय दमडीची ही मदत सरकारकडून मिळाली नसल्याने पत्रकारांमध्ये मोठा संताप आहे.

कर्जत तालुका पत्रकार संघाच्यावतीने कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना तातडीने लागू करावी, पत्रकारांसाठी प्रत्येक रूग्णालयात ऑक्सीजन, व्हेंटीलेटरसह त्वरीत बेड उपलब्ध करावे आणि यात ग्रामीण भागातील पत्रकारांचाही समावेश करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष मुन्ना पठाण,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे,तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोतीराम शिंदे,कार्यध्यक्ष निलेश दिवटे,सचिव मच्छिंद्र अनारसे,खजिनदार अफरोज पठाण, सल्लागार सुभाष माळवे,आशिष बोरा आदि.उपस्थित होते.