पनवेलमधील कामोठेचा संपूर्ण भाग कंटेनमेंट झोन – महानगरपालिका आयुक्तांनी केले जाहीर

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने आयुक्त गणेश देशमुख यांनी संपूर्ण कामोठे कंटेनमेंट झोनम्हणून जाहीर करण्याचा मोठा निर्णय ८ मे

 पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने आयुक्त गणेश देशमुख यांनी संपूर्ण कामोठे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्याचा मोठा निर्णय ८ मे ला रात्री जाहीर केला. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १३८ रुग्ण सापडले आसून त्यापैकी  ४० % रूग्ण एकट्या कामोठ्यातील आहेत. कामोठेचे क्षेत्रफळ २.७६ चौ.किमी आहे. तसेच लोकसंख्या १.१३ लाख आहे. कामोठेमध्ये शुक्रवार रात्रीपर्यंत ५४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कामोठे बाहेर संसर्ग फैलावू नये, यासाठी हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी त्या त्या भागातील इमारती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत असत. मात्र कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असून या भागात बाहेरील लोकांना व येथील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव असेल. यात अपवाद म्हणून फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवा व पोलीस इ. कामे करणारे नोंद करून जाऊ शकतील असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.