करंजा मच्छी मार्केटमध्ये वाढतेय लोकांची गर्दी, ग्रामस्थांची मार्केट दुसरीकडे हलविण्याची मागणी

उरण: करंजा गावाच्या वेशीवर सुरू झालेल्या मासळी मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी अनेक कोरोना बाधीत गावातील माणसांचा वावर वाढत आहे. यामुळे करंजा गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला तर जबाबदार

 उरण: करंजा गावाच्या वेशीवर सुरू झालेल्या मासळी मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी अनेक कोरोना बाधीत गावातील माणसांचा वावर वाढत आहे. यामुळे करंजा गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला तर जबाबदार कोण? असा सवाल करंजा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला करीत आहेत. हे मार्केट येथून हलविण्याची  मागणी करण्यात येत आहे. करंजा गावाच्या वेशीवर मासळी मार्केट सुरू केले आहे. त्याठिकाणी मासळी खरेदी करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पनवेल, डोंबिवली, बेलापूर, वाशी व ठाणे आदी ठिकाणावरून गाड्या घेऊन येत आहेत. यातील बहुतेक भागात कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. मासळी खरेदीसाठी परगावातील येणाऱ्या माणसांमुळे करंजा गावात कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात कोरोनाची लागण झाल्यास जबाबदार कोण असा सवाल करंजा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गोविंद धोंडू थळी यांनी चाणजे ग्रामपंचायतीला करीत हे मार्केट करंजा परिसरातून हलविण्याची मागणी केली आहे.