कर्जत तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांची सरकारविरोधात निदर्शने

कर्जत : महाराष्ट्रात आलेल्या कोरोना नावाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करताना ठाकरे सरकार अपयशी ठरले असा आरोप करत भाजपने राज्यव्यापी महाराष्ट्र बचाओ, माझे आंगण, माझे रणांगण हे आंदोलन

 कर्जत : महाराष्ट्रात आलेल्या कोरोना नावाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करताना ठाकरे सरकार अपयशी ठरले असा आरोप करत भाजपने राज्यव्यापी महाराष्ट्र बचाओ, माझे आंगण, माझे रणांगण हे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनांतर्गत आज कर्जत तालुक्यात देखील भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या घराच्या अंगणात निदर्शने केली आहेत. अत्यंत शांत, शिस्तबद्ध व सामाजिक अंतर राखत हे आंदोलन कर्जत भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली खाली करण्यात आले. 

राज्य सरकारच्या वतीने शेतकरी, बारा बलुतेदार, व असंघटित कामगारांना ५० हजारांचे पॅकेज द्या, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसेच जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात देखील झाला आहे. यात अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधित राज्याच्या यादीत महाराष्ट्र अव्वलस्थानी आहे. तेव्हा महाराष्ट्रात कोरोनाशी मुकाबला करताना योग्य उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलॆ असल्याचे म्हणत राज्यात भाजपच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्र वाचवा  शेतकरी, १२ बलुतेदार, व असंघटित कामगारांना ५० हजारांचे पॅकेज द्या, अशी मागणी असल्याचे फलक घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी आज कर्जत तालुक्यात विविध भागात आपल्या घराच्या अंगणात निदर्शने केली. तालुक्यातील नेरळ शहरात मुख्य ठिकाण असलेल्या युनियन बँक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबिका नाका, सानेवाडा, हेटकरआळी, धारप सभागृह, संत गोरा कुंभार चौक येथील आपल्या अंगणात हातात फलक घेऊन तोंडाला मास्क व सामाजिक अंतर सह जमावबंदीचे पालन करत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, पद्मा प्रकोष्टचे प्रांत प्रमुख नितीन कांदळगावकर, पंचायत समिती सदस्य नरेश मसने, ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा कराळे, महिला आघाडीच्या मृणाल खेडकर, शहर अध्यक्ष अनिल जैन, मिलिंद साने, नरेंद्र कराळे, दत्तात्रेय ठमके, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते 
कर्जत शहरात बाजारपेठ, विठ्ठलनगर, कोतवालनगर, म्हाडा कॉलनी, दहिवली, सोनारआळी, कोकणआळी, सुयोग नगर, भिसेगाव, एसटी स्टँड, गुंडगे, पंचशील नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा विविध भागात तेथील कार्यकर्ते, नागरिकांनी हातात निषेध फलक काळे मास्क लावून उस्फुर्तपणे निषेध केला. याप्रसंगी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस कल्पना दास्ताने, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मंदार मेहेंदळे महिला मोर्चा तालुकाध्यक्ष स्नेहा गोगटे नगरसेविका स्वामिनी मांजरे, आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.