करवले गावातील अनधिकृत बांधकाम पनवेल महापालिकेने हटवले

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे करवले गाव येथील सरकारी गुरे चरण्याच्या जागेत करण्यात येत असलेले अनधिकृत बांधकाम आज महापालिकेने कारवाई करून पाडले. तसेच घोट गावातील

 पनवेल  :   पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे करवले गाव येथील सरकारी गुरे चरण्याच्या जागेत करण्यात येत असलेले अनधिकृत बांधकाम आज महापालिकेने कारवाई करून पाडले. तसेच घोट गावातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून तो मोकळा करण्यात आला. पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे करवले गाव येथील सरकारी चरण जागेत गोठ्याचे अनाधिकृत बांधकाम करण्यात येत होते. याबाबत माहिती मिळताच ते बांधकाम निष्कासित करणेबाबत उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्रभाग अधिकारी भंडारी व अधिक्षक कडू यांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज  दुपारी १२.३० वाजता कारवाई सुरू करून जेसीबी व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या सहाय्याने अनाधिकृत गोठ्यांचे बांधकाम हटविण्यात आले. 

 घोट गाव येथील येण्या जाण्याच्या रस्त्यात अतिक्रमण करून रस्ता स्थानिक व्यक्तीने दांडगाई करून अडविला होता. हे अतिक्रमण देखील हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. ही कारवाई प्रभाग अधिकारी  दशरथ भंडारी, उपविभाग नावडेचे प्र. अधीक्षक  हरिश्चंद्र कडू , बिट निरीक्षक संतोष सोनवणे, तळोजा पोलीस ठाणे येथील  पोलीस कर्मचारी, उपविभाग नावडेचे कर्मचारी यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.