Khopoli strictly closed, setters of all except banks and government offices closed

केंद्र शासनाने शेती व शेतकऱ्यांशी चर्चा न करता पंजाब, हरियाणा यांसह इतर राज्यातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन छेडले असून केंद्र शासन चर्चा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

खोपोली : केंद्र शासनाने (central Government) शेती व शेतकऱ्यांच्या संदर्भात काळे कायदे लागू केले आहेत. त्या कायद्यांना विरोध करण्यासाठी विविध संघटनांनी आज भारत बंदचे ( strictly closed) आवाहन होते. या बंदला पाठींबा दर्शविण्यासाठी खालापूर तालुक्यातील विविध राजकीय संघटना व व्यापाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवित बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पाठिंब्याला आज संपूर्ण तालुक्यातून उत्फुर्त प्रतिसाद लाभल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.


केंद्र शासनाने शेती व शेतकऱ्यांशी चर्चा न करता पंजाब, हरियाणा यांसह इतर राज्यातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन छेडले असून केंद्र शासन चर्चा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध संस्था, राजकीय पक्ष यांनी भारत बंदला पाठींबा दर्शविला होता. याचाच एक भाग म्हणून आज खालापूर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी बंदला दिलेला पाठिंबा आहे. सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्याची वाट पाहणाऱ्या लोकांना आज दुकानांचे सेटर बंदच राहिल्याचे दिसून आले. बँका,शासकीय कार्यालये वगळता कोणतेही दुकान, व्यवसाय उघडलेल्याचे पहायला मिळाले नाही.