खोपोलीसह संपूर्ण खालापूर तालुक्यात वाऱ्यासह गारांचा पाऊस- वीटभट्टी,भाजीचे मळे यासह शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

खोपोली: आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोराच्या वाऱ्याने आपला प्रवास सुरू केला. काही कळायच्या आतमध्ये आकाशात ढगांनी गर्दी करत काळोख केला.एकीकडे जोराने सुटलेल्या वाऱ्याने संपूर्ण वातावरण धुळीने

खोपोली: आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोराच्या वाऱ्याने आपला प्रवास सुरू केला. काही कळायच्या आतमध्ये आकाशात ढगांनी गर्दी करत काळोख केला.एकीकडे जोराने सुटलेल्या वाऱ्याने संपूर्ण वातावरण धुळीने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना आहे तेथेच उभे राहण्यास भाग पाडले.पाठोपाठ आलेल्या जोराच्या पावसासह गारांच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडविली.

सायंकाळी आलेल्या जोराच्या वाऱ्यासह पावसाने खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांची चांगलीच तारांबळ उडविली. अगोदरच कोरोनाच्या लाँकडाऊनने सर्वांचे धंदे,व्यवसाय तसेच अडकून पडले असतांना आज अचानक आलेल्या पावसाने सर्वांची त्रेधातिरपीट उडविली. अंतिम टप्प्यात आलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचे काम लॉकडाऊनमुळे रखडले असल्याने कच्चामाल तसाच फडात पडून आहे. हा माल भट्टीत रचण्यासाठी एखाद दुसऱ्या अडवड्याची गरज आहे. मात्र हे व्यावसायिक लॉकडाऊन कधी उटते याची प्रतिक्षा करत आहेत.तसेच आदिवासी बांधवांसह शेतकऱ्यांनी शेतात लावलेले भाजीचे मळे जोराच्या वाऱ्या पावसामुळे आडवे झाले आहेत. हातातोंडाशी आलेले संपूर्ण पीक शेतात आडवे झाल्याने अगोदरच कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे आयत्यावेळी कंबरडे मोडले आहे. साधारण एक तासभर आलेल्या जोराच्या वाऱ्या पावसाने सर्वांचीच धांदल उडविल्याचे दिसून आले. जोराच्या वाऱ्याने मोठमोठ्या झाडांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे पडल्याचेही दिसत आहे.यामुळे गाड्यांचे व घरांचे मोठे नुकसान झाले आहे.