अखेर खारघरच्या मैदानातील कचरा डेपो विनोद घरत यांच्या प्रयत्नांमुळे हटवला

पनवेल : स्मार्ट सिटी खारघरच्या मैदानातील कचरा डेपो अखेर हटवला. खारघरमध्ये कोरोनाचे संकट सुरू असताना पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तेथे कचरा डेपो बनवण्याचा ठेकेदार आणि प्रशासनाचा प्रयत्न भाजपच्या खारघर

पनवेल : स्मार्ट सिटी खारघरच्या मैदानातील कचरा डेपो अखेर हटवला. खारघरमध्ये कोरोनाचे संकट सुरू असताना पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तेथे कचरा डेपो बनवण्याचा ठेकेदार आणि प्रशासनाचा प्रयत्न भाजपच्या खारघर तळोजा मंडळाचे युवा अध्यक्ष विनोद घरत आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उधळून लावल्याने खारघरवासीयांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. 

पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघरची ओळख स्मार्ट सिटी म्हणून आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील  कचरा ठेकेदार कंपनी पहिल्या पासून घोट येथे नेऊन टाकत होती.काही दिवसापूर्वी सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध केला. त्यामुळे शहरातील कचरा उचलणार्‍या ठेकेदाराने शहरातील कचरा खारघर मधील पेठपाडा मेट्रो स्टेशन जवळ नरसी मनजी कॉलेज समोरील मैदानात टाकण्यास सुरुवात केली . दोन दिवसातच त्याठिकाणी कचर्‍याचे डोंगर उभे राहिले. त्यात पाऊस पडल्याने त्या कचर्‍याची सर्वत्र दुर्गंधी पसरली. आजूबाजूच्या सोसायटीतील नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली.  त्यामुळे या सोसायटीतील  नागरिकांनी भाजपच्या खारघर तळोजा मंडळाचे युवा अध्यक्ष विनोद घरत यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली.त्यांनी नगरसेवक  नगरसेवक अभिमन्यु पाटील  आणि  रितेश रघुराम  यांच्या सोबत  गुरुवारी संध्याकाळी त्याठिकाणी जाऊन कचरा टाकण्यासाठी आलेल्या  गाड्या अडवून प्रशासनाला जाब विचारल्यावर ठेकेदाराने आजपासून कचर्‍याच्या गाड्या त्या ठिकाणी टाकणे बंद करून तेथील कचरा उचलण्यास सुरुवात केली .  

 खारघरची ओळख स्मार्ट सिटी म्हणून असताना आमच्या परिसरात दोन दिवस दुर्गंधी सुटल्याने आम्ही हैराण झालो होतो. येथील मैदानावर कचर्‍याचे डोंगर उभे केलेले पाहून धक्काच बसला. कोरोंनाचा संसर्ग होत असतानाच अशा प्रकारे कचरा टाकून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येथे रोगराईला आमंत्रण देणारा हा प्रकार होता.त्यामुळे आम्ही विनोदजी घरत यांना याबाबत माहिती दिली त्यांच्या मुळे येथे कचरा टाकणे बंद करून ठेकेदाराने आज कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. –  रिया आहुजा , प्रोव्हजी कॉम्प्लेक्स