खोपोलीत सेवाभावी तत्वावर कोविड हॉस्पिटल चालविण्याचा विचार

खालापूर : खोपोलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संक्रमण काळात रुग्ण संख्या वाढल्यास एकंदर काय उपायोजना असा यक्ष प्रश्न असतानाच यासाठी प्रयत्नशील असताना कोरोना संक्रमण सुरू झाल्यानंतर संचारबंदी पब्लिक

खालापूर : खोपोलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संक्रमण काळात रुग्ण संख्या वाढल्यास एकंदर काय उपायोजना असा यक्ष प्रश्न असतानाच यासाठी प्रयत्नशील असताना कोरोना संक्रमण सुरू झाल्यानंतर संचारबंदी पब्लिक कर्फ्यू सोशल डिस्टन्सिंग यासारखे उपाय पाळून कोरोना विषाणूची संक्रमणची साखळी तोडण्याचे काम देखील खोपोलीकरांनी यशस्वी केले .मात्र एवढे करूनही या आठवड्याभरात कोरोना व्हायरसने  खोपोलीत प्रवेश करून घाला घातला आहे.  रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.  वाढत्या संख्येचा विचार करताच रविवारी खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावून चर्चा केली . या बैठकीत खोपोलीतील मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेऊन कोरोना संक्रमित रुग्णांचे त्यांच्या कुटुंबाचे विदारक वातावरण यावर सखोल चर्चा झाली.  यामुळे शासकीय नियमांचा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु खोपोलीकरांच्या उपचाराचे काय हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला दिसून येत आहे. 

शासकीय यंत्रणेकडे निधी असेल सोयीसुविधा निर्माण करायची तयारी असेल तर इतर प्रशासकीय पूर्तता करण्याची मानसिकताही असेल मात्र त्यासाठी मान्यता आणि इतर औपचारिकता त्याचबरोबर तांत्रिक आरोग्य विषयी बाबी हाताळणार कोण असा अडसर होता . यावर उपाय म्हणून खोपोलीत कोविड १९ हॉस्पिटल आवश्यकतेबद्दल सर्वांनी सहमती दर्शवली आणि यासाठी मोठ्या प्रमाणात समर्थनीय पाठिंबाही मिळाला . खोपोलीत कोविड हॉस्पिटल निर्मितीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी निधी चौधरी, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे ,कर्जत खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे ,प्रांताधिकारी वैशाली परदेशी, खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार, नगराध्यक्षा सुमनताई औसरमल ,मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी सोयी-सुविधांसाठी तात्काळ शासकीय पातळीवर पत्रव्यवहार करून प्रयत्न केले.  कोविड  हॉस्पिटल खोपोलीतील शिळफाटा येथे निर्माण झालेल्या नियोजित हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये प्रायोगिक तत्वावर खोपोली कोविड  हॉस्पिटल निर्माण करण्याची संकल्पना करताच हा संपूर्णतः सामाजिक उपक्रम राबवून प्रस्ताव केल्यास शासकीय पातळीवर तांत्रिक मंजुरी मिळण्याची ही शक्यता वर्तवली गेली आहे . 

कोवीड हॉस्पिटल हे प्रभाग क्रमांक १०उर्दू  प्राथमिक शाळा परिसर शिळफाटा खोपोली येथे असेल व आरोग्यविषयक जबाबदारी डॉक्टर रणजीत मोहिते व खोपोलीतील सर्व डॉक्टर सेवाभावी तत्वावर घेणार आहेत. याकरिता लागणारे मदतनीस नर्सेस व इतर कर्मचारी हे सेवाभावी तत्वावर सहकार्य करतील. याकरिता आवश्‍यक उपकरणे आणि साहित्य सेवाभावी तत्वावरच उपलब्ध केले जाईल. या हॉस्पिटलमधील रुग्णांना ना नफा ना तोटा तत्त्वावर अर्थात वाजवी दरात औषधे पुरवली जातील.  यासाठी पालिका प्रशासनाकडून आवश्यक असणारा कर्मचारी वर्गाची सुविधा केली जाईल . या इमारतीची तूटफूट होऊ नये याची काळजी घेतली जाईल व शासकीय निर्देशाप्रमाणे सेवा कार्य सुरू राहील परंतु दुर्दैवाने सेवाभावी तत्वावर सेवा देत असताना एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला मात्र केवळ नगरपालिका प्रशासन जबाबदार नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असेल खोपोलीतील डॉक्टर असोसिएशन ,केमिस्ट असोसिएशन , सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी सेवाभावी उपक्रम राबविण्याच्या कामी सहभाग होण्याची तयारी दर्शविली आहे. 

तांत्रिक बाबी व उपचाराचा जुजबी खर्चाचा तपशील देण्यात येईल असेही खोपोलीतील एमडी असणारे डॉक्टर रणजित मोहिते यांनी खालापूर तहसील कार्यालयात प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांच्या उपस्थितीत सर्वांच्या सोयीसुविधेसाठी उपाययोजना सविस्तर मांडली आहे . या उपक्रमाचा सर्वांनी सेवाभावी वृत्तीने स्वागत करून सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.  परंतु सर्वच बाबी सेवाभावी तत्वावर होणार नसून काही खर्चाच्या बाबी आहेत.  त्यासाठी यथाशक्ती आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. ज्यांना खरोखरच सामाजिक भावनेने व तळमळीने प्रत्यक्षरीत्या फिल्डवर काम करण्याची इच्छा आहे त्यांनी निश्चितच या हॉस्पिटलसाठी योगदान देण्यासंबंधी आव्हानही डॉक्टर रणजित मोहिते यांनी केले आहे.