राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ३२ महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन गुणगौरव

खोपोली : कोरोना विषाणूच्या महामारी युध्दात पुरूषांच्या खांद्याला खांदा स्वतःच्या जीवाची तसेच कुटूंबांची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षितेसाठी अहोरात्र कष्ट घेत असलेल्या शासकीय रूग्णालयातील महिला

खोपोली : कोरोना विषाणूच्या महामारी युध्दात पुरूषांच्या खांद्याला खांदा स्वतःच्या जीवाची तसेच कुटूंबांची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षितेसाठी अहोरात्र कष्ट घेत असलेल्या शासकीय रूग्णालयातील महिला डॉक्टर्स,परिचारिका, प्रशासकीय अधिकारी,आशा वर्कर,पत्रकार,सफाई कामगार,सामाजिक कार्यकर्त्या आदी ३२ महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिना निमित्ताने महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या संकल्पेनूत कोव्हीड ‘मर्दानी महाराष्ट्राची’ असा किताब देवून गौरव करीत शाबासकीची थाप पाठीवर टाकून लढण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न खोपोली शहर महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिना निमित्ताने महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी कोव्हीड -१९ च्या विरोधात  लढणाऱ्या कोरोना योद्धा महिलांना ‘मर्दानी महाराष्ट्राची’ असा किताब देवून गौरव केला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,नगराध्यक्षा सुमन औसरमल,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनेष यादव,युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील,आरोग्य सभापती वैशाली जाधव,नगरसेविका केविना गायकवाड, महिला शहर चिटणीस सुजाता यादव आदि उपस्थितांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता वानखेडे, आधिपरिचारिका स्मिता कोजगे,खोपोली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस, तलाठी भांमरे,वीजवितरण कंपनीतील अधिकारी, महिला पत्रकार,सामाजिक कार्यकर्त्या वर्षा मोरे,जयमाला पाटील, कुलकर्णी,पालिकेतील सफाई कामगार,मुळगांव पोलीस पाटील आदी विविध क्षेत्रातील ३२ महिलांना कोरोनाच्या लढयात मेहनत घेत असल्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून शरद पवार यांच्या ‘महिला सन्मानाचा वारसा’ या उपक्रमातंर्गत  एक वसा जोपासत गुणगौरव करीत पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.

कोरोनाच्या लढ्यात खोपोली पालिकेचा आरोग्य विभाग,पोलीस,प्रशासन, सामाजिक कार्यकर्त्या महिला उत्तम काम करीत असल्याबद्दल नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी समाधान व्यक्त केले आहे. महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार आयोजित केलेल्या कोरोना महिला योध्दा कार्यक्रमास विविध स्तरातील महिलांना  प्रतिसाद दिल्याबद्दल महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी आभार व्यक्त केले आहे.