खोपोली नगरपालिकेचा कारभार आता नव्या इमारतीमधून चालणार, उद्या प्रवेश

शिळफाटा : खोपोली नगरपालिकेच्या नव्या इमारतीमध्ये स्थलांतर होऊन प्रवेश कार्यक्रम उद्या संपन्न होणार असल्याचे खोपोली नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या

शिळफाटा : खोपोली नगरपालिकेच्या नव्या इमारतीमध्ये स्थलांतर होऊन प्रवेश कार्यक्रम उद्या संपन्न होणार असल्याचे खोपोली नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या शुभप्रवेश प्रसंगी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे ,कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांना निमंत्रित केले असल्याचेही त्यांनी सांगितले. ७ एप्रिल रोजी नव्या इमारतीमधील स्थलांतरित खोपोली नगरपालिकेच्या कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन करून या उद्घाटन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, पालकमंत्री आदिती तटकरे ,आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात भव्य असा संपन्न होणार होता.  परंतु अचानक या देशावर कोरोनाव्हायरसच्या महामारीचे संकट आल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही . याबद्दल नाराजीचे सूर त्यांच्या बोलण्यातून आले. 

नव्या इमारतीमध्ये खोपोली नगरपालिकेचे कार्यालय होत असताना आम्ही सर्व नगरसेवक, सभापती, गटनेते एकत्रित आहोत. खोपोलीतील सामाजिक संस्था चालक, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी बांधव, सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मिळून आपले एक कुटुंब असल्याचे नगराध्यक्ष सुमनताई औसरमल यांनी सांगितले. कुटुंबात थोडेफार इकडेतिकडे होत असतेच परंतु तसे काही नसल्याचा खुलासा करून आम्ही सर्वच एकत्रितपणे या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यरत राहून काम करीत आहोत.

  या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने नगरपालिका कार्यालयांमधील जागेसंबंधी व लोकप्रतिनिधींना त्याचबरोबर पत्रकारांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आले आहे का ? असा प्रश्न विचारला असता खोपोली नगरपालिकेचे गटनेते सुनील पाटील यांनी आपल्या दोन्ही गटनेते यांना वेगवेगळ्या जागा देण्याऐवजी एकच जागा देऊन उर्वरित जागेसाठी पत्रकारांचा विचार करण्याची सूचना करताच नगराध्यक्षा सुमनताई औसरमल यांनी होकार देताच पत्रकारांना दिलासा मिळाला आहे.  खोपोलीतील डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे केलेले काम व कोरोना परिस्थिती गरजू गरिबांना देण्यात आलेले धान्य आणि त्यासाठी विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे लाभलेले मोलाचे सहकार्य याबाबत नगराध्यक्षा सुमनताई औसरमल उपनगराध्यक्ष विनिताताई कांबळे (औटी) , गटनेते सुनील पाटील, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल यांनी मनापासून समाधान व्यक्त केले आहे.  नवे खोपोलीचे कार्यालय हे सुसज्ज असल्याचे जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल यांनी सांगून सर्व लोकप्रतिनिधी सहकारी कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. कोरोनाच्या महामारी संकटात खोपोलीतील सर्व सामाजिक राजकीय तसेच पत्रकार संघटनांनी मोलाची कामगिरी केली असल्यामुळे या कोरोना महामारीला सामोरे गेल्याचेही नगराध्यक्षा औसरमल यांनी सांगितले आहे. 

या वेळी ४०० अपंगांना आमदाराच्या सहकार्याने खोपोलीत धान्य वाटप केले असून ६०० आदिवासी बांधवांना लवकरच धान्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. नवीन कार्यालयाची इमारत ३९ हजार चौरस फूट असून पाच मजल्याची सुसज्ज अशी इमारत असल्याने विरोधकांचा विरोध जरूर  मावळेल अशी आशा सुद्धा व्यक्त केली आहे.  नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, नव्या इमारतीचे सुसज्ज असे बांधकाम झालेले असताना व जुनी नगरपालिका कार्यालयाची इमारत ही  जीर्ण स्वरुपाची झाल्याने नव्या इमारतीमध्ये आपले कार्यालय स्थलांतरित होणे गरजेचे वाटते आहे . परंतु कोरोना महामारी संकट या देशांबरोबरच संपूर्ण राज्यावर कोसळले असल्यामुळे थाटात उद्घाटन होऊ शकत नसल्याने तरी भविष्यात नगरपालिका कार्यालयाचे कार्यक्रम थाटात करण्याचा मानसही नगराध्यक्ष औसरमल यांनी व्यक्त केला आहे. जुनी इमारत सोडून नव्या इमारतीमध्ये प्रवेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे नव्या कार्यालयाचे शुभ प्रवेश होत आहे.