खोपोलीत शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा

खालापूर: शिवसेना पक्षाचा ५४ वा वर्धापन दिनानिमित्ताने शहरप्रमुख तथा गटनेते सुनील पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील गोरगरीब गरजू व्यक्तींना शिवभोजन थाळीचे व रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या अर्सेनिक

 खालापूर: शिवसेना पक्षाचा ५४ वा वर्धापन दिनानिमित्ताने शहरप्रमुख तथा गटनेते सुनील पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील गोरगरीब गरजू व्यक्तींना शिवभोजन थाळीचे व रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले . 

सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचे संकट आले असतांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन लोकहिताच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकीने  व साधेपणाने साजरा करावा असा पक्षाचा आदेश असल्यामुळे या उपक्रमाचा भाग म्हणून खोपोलीत शिवसेनेचा वर्धापन दिन देखील साधेपणाने सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून साजरा करण्यात आला .

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधीकारी कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम राबवून सर्वसामान्य गरीबगरजू व्यक्तीला मदतीचा हात देण्याचेच काम केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, खालापूर तालुका समन्वयक एकनाथ पिगळे ,गटनेते सुनील पाटील , उपनगराध्यक्षा विनिता कांबळे औटी,नगरसेवक राजू गायकवाड,नगरसेविका प्रमिला सुर्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील ,खालापूर तालुका समन्वयक एकनाथ पिगळे ,गटनेते सुनील पाटील ,उपनगराध्यक्षा विनिता कांबळे औटी,नगरसेवक राजू गायकवाड ,नगरसेविका प्रमिला सुर्वे,शिवसहकार सेनेचे शहर संघटक हरीश काळे ,शहर संघटक दिलीप पुरी ,शहर संपर्क प्रमुख विवेक पाटील ,युवासेना शहर अधिकारी संतोष मालकर ,उपशहरप्रमुख प्रसाद वाडकर, युवासेना सल्लागार मोहन केदार ,शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण रिठे ,उपशहर अधिकारी कल्पेश लोवांशी , विजय कुंडले यांच्यसह आदी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .