निर्सग चक्रीवादळाने म्हसळाकरांचे पाणी पुरवठ्याची केली दाणादाण –  कोकणी डॉक्टर असोसिएशन ठरत आहे पाणी देवदूत

म्हसळा :म्हसळा तालुक्यात म्हसळा शहर वगळून ८०% गावांतून नळ पाणीपुरवठा योजना या लिफ्टने पाणी चढवून वितरण करणे या प्रकारच्या आहेत. ३ जूनला निर्सग चक्रीवादळाने श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव,

 म्हसळा : म्हसळा तालुक्यात म्हसळा शहर वगळून ८०% गावांतून नळ पाणीपुरवठा योजना या लिफ्टने पाणी चढवून वितरण करणे या प्रकारच्या आहेत. ३ जूनला निर्सग चक्रीवादळाने श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा, मंडणगड या तालुक्यातील काही भागातून चक्रीवादळाने थैमान घातल्याने तालुक्यातील सर्वच ठिकाणची विजवितरण व्यवस्था पूर्णपणे बंद पडल्याने म्हसळा तालुक्यातील सुमारे ८०% जनता पिण्याचे पाण्या वाचून ३ जून पासून वंचीत झाली होती. मात्र ८ जून पासून या सर्व भागातील पिडीत गावाना कोकणी डॉक्टर असोसिएशन ही सेवाभावी संस्था मदतीला धावून आली त्यानी या भागातील लोकाना मेणबत्ती पासून सोलर लॅम्प, कपडे, अन्नधान्य, ताडपत्री अशा बहुतांश वस्तू भेट स्वरुपांत दिल्या त्याच बरोबरीने विविध भागांत ८ ते १० मोबाईल जनरेटर व्हॅन देऊन विजपुरवठा नसताना तब्बल ९० ते १०० नळ पाणी योजना कार्यान्वित करून ६० ते ७० हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला. त्यामुळे त्यांचे श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा, बाणकोट या सर्वच तालुक्यांतून कोकणी डॉक्टर असोसिएशनचे कौतुक होत आहे.

जिल्हाधिकारी रायगड, ग्रा.पा.पु.उप-विभाग म्हसळा, पंचायत समिती यांच्या समन्वयाने शासनाने आणि कोकणी डॉक्टर असोसीएशन या संस्थेनी मोबाईल व्हॅन जनरेटर पुरवल्याने नैसर्गिक अपत्तीचे काळांत या भागातील जनतेला पाणी पुरवठा करण्यात यश प्राप्त झाले.  म्हसळा तालुक्यातील ८ गावे व ९ वाड्याना पाणी पुरवठा करणारी तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना यामधील खारगाव (खु), सकलप, तोंडसुरे, वरवठणे, आगरवाडा, पेडांबे, रेवली, गणेशनगर आणि अन्य ९वाड्या, मेंदडी, मेंदडी कोंड, मोहल्ला बौद्धवाडी, वारळ, काळसुरी, आंबेत, संदेरी, फळसप, खारगाव, खरसई, पानदरे, देवघर, पाभरे, चाफेवाडी, लिपणीवावे, घूम, नेवरूळ, कोंझरी, तळवडे, सुरई, खामगाव, कासारमळई, सोनघर गोंडघर, केलटे, कणघर, वांगणी, लेप, ता.शिर्के, तोराडी, दगडघूम आदी गाव वाडयाना पाणी पुरवठा केला. तशाच पध्दतीने रोहा तालुक्यातील ३२ गाववाड्या, श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी व अन्य गावे, माणगाव तालुक्यातील साई, चांढोरे, रानवडे, मंडणगड तालुक्यातील बाणकोट परिसरांतील गाववाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

निर्सग चक्रीवादळाने श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा, मंडणगड या तालुक्यातील सर्वच भागातून थैमान घातल्यावर  कोकणी डॉक्टर असोसिएशन या सेवाभावी संस्थेने निर्सग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केलेल्या गावांतून कोणतीही प्रसिद्धी न करता आपत्तीग्रस्ताना अन्नधान्य किट, मेणबत्ती, टॉर्च, ताडपत्री, कौले, पत्रे अशा आवश्यक साहित्याचे गरजवंताना वाटप केले, त्याच वेळी स्थानिक ग्रामस्थानी आमचे गावाला पिण्याचे पाण्याची आवश्यकता आसल्याचे सांगताच असोसिएशनच्या मंडळीनी श्रीवर्धन म्हसळा तालुक्याना पाणी पुरवठा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ग्रा.पा.पु.उप-विभाग व गटविकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधून योग्य नियोजन करून वरील सर्व गावाना पाणी पुरवठा काही दिवसाच्या अंतराने करण्यास मदत केली. यासाठी असोसिएशनचे चेअरमन डॉ.वसीम पोफळणकर, डॉ.एम.एस.राऊत, डॉ.नसीम खान, डॉ.इम्रान फकीह ,उप-अभियंता युवराज गांगुर्डे, ग.वि.अ.वाय.एम.प्रभे, अभियंता अशोक कोकरे यानी उत्कृष्ट नियोजन केले.