कोलाड पोलिसांची देशी,विदेशी व गावठी दारुच्या विरोधात धडक कारवाई

सुतारवाडी: लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने बंद आहेत.मात्र या काळात काही ठिकाणी अवैध धंदे चालु झाल्याने कोलाड सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत तायडे यांच्या टिमने कोलाड परिसरात अवैध धंदयाच्या विरोधात धडक

 सुतारवाडी: लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने बंद आहेत.मात्र या काळात काही ठिकाणी अवैध धंदे चालु झाल्याने कोलाड सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत तायडे यांच्या टिमने कोलाड परिसरात अवैध धंदयाच्या विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. संचारबंदी काळात बिअर शॉप, वाईन शॉप  परमिट रुम इत्यादींना सर्व प्रकारच्या दारु विक्रीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. तसेच रायगड जिल्हयातील सर्व परवानाधारक मद्य विक्रीचे व्यवसाय बंद करण्याबाबत आदेश पारित केले आहेत. तथापि काही समाज विघातक घटक सदर आदेशांची पायमल्ली करुन अवैधरित्या छुप्या पध्दतीने मद्यविक्री करीत असल्याची गोपनिय माहिती मिळत होती. त्यामुळे अशा प्रकारे छुप्या पध्दतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करणेचे आदेश रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर  यांनी सर्व पोलीस ठाणे यांना दिले होते.या अनुषंगाने रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशात तायडे यांच्या टिमने कोलाड परिसरात अवैद्य धंदयाविरोधात धडक मोहीम हाती घेतली अाहे. कोलाड पोलिसांच्या वतीने ठिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असुन यामध्ये कोलाड पोलिस ठाण्यात अवैद्य धंदे करणार्यांच्या विरोधात लॉकडाऊनच्या काळात  ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्हयातील १० आरोपीना अटक करण्यात आली आहे.कोलाड पोलिसांनी या गुन्हयातुन आरोपीकडुन देशी विदेशी गोवा बनावटीची २०००० रुपयांची दारु जप्त केली आहे.यासह २ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.