कोलाडमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून दारूची विक्री

सुतारवाडी: गेल्या २४ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तेव्हापासून जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकान बंद करण्याचा इशारा शासनाने दिल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले विशेषतः वाईन शॉप आणि बार मालकांचे

सुतारवाडी: गेल्या २४ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तेव्हापासून जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकान बंद करण्याचा इशारा शासनाने दिल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले विशेषतः वाईन शॉप आणि बार मालकांचे आणि तळीरामांचे मोठ्या प्रमाणावर धावे दणाणले होते. कधी वाईन शॉप उघडतात याची प्रतीक्षा हजारो तळीरामांना होती. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी वाईन शॉप सुरू झाले. त्यांनी शासनाचे नियम पाळलेले आहेत. कोलाड नाक्यावर एक वाईन शॉप आहे तेथे आज सकाळपासूनच दोन मोठ्या रांगा लावल्या होत्या. हे वाईन शॉप मुंबई-गोवा महामार्गावर असल्यामुळे दक्षता घ्यावी लागत असल्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये ठराविक अंतर ठेवून मद्यपी आपआपली पार्सल घेऊन बाहेर पडत होते. दोन्ही बाजूंनी रांगा लागलेल्या असल्या तरी एका इसमाला किमान ३० मिनिटे एवढा वेळ लागत होता.  नऊ वाजल्यापासून उन्हाचा पारा चढत होता तरीसुद्धा भर उन्हात आपला नंबर केव्हा येईल या प्रतीक्षेत तळीराम होते.